तेर (प्रतिनिधी) मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज व धनगर समाजाच्या वतीने तेरमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना तेर गावात बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.                                                             

28 आक्टोबरला सकाळी सकल मराठा समाज व धनगर समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. या  बैठकीत जोपर्यंत मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना तेरमध्ये प्रवेश दिला जावु नये असे यावेळी ठरवण्यात आले.


 
Top