धाराशिव (प्रतिनिधी)- येथील जिल्हा पोलीस दलाच्या मैदानावर सुरू असलेल्या  छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्हा पोलीस दलातील हॅन्डबॉल टीमला रूपामाता परिवारच्या वतीने स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले. यावेळी रूपामाता परिवारचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

धाराशिव येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 6 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीसांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारिरीक व मानसिक क्षमता उंचवावी , संघभावना निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय अशा पाच पोलीस घटक दलातील एकुण 450 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, हॅन्ड बॉल, बास्केट बॉल, व्हॉली बॉल, फुटबॉल, हॉकी, 100 मीटर-400 मीटर- 5,000 मीटर धावणे, अडथळा शर्यत, जलतरण, तायकाँदो  अशा विविध क्रिडा प्रकारांचा समावेश आहे.  या स्पर्धेत सहभागी झालेल्या धाराशिव जिल्हा पोलीस दलातील हॅन्डबॉल टीमला रूपामाता परिवाराच्या वतीने ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले.  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक गोरे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


 
Top