धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील जनतेचा खा.शरदचंद्र पवार यांच्या कामावर विश्वास आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, दिनदलित, अल्पसंख्यांक व भटके विमुक्त यांच्यासाठी झोकून देवून काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे धाराशिव जिल्ह्याचे संपर्क नेते माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी केले.

धाराशिव येथे शासकीय विश्रामगृहात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये त्यांनी शासकीय योजना, पक्षाने केलेली कामे, विविध योजनेची माहिती सामान्य मानसांपर्यंत पोहंचविण्यासंदर्भात विस्तृत माहिती आमदार राजेश टोपे यांनी दिली. 

याप्रसंगी माजी आ. राहुल मोटे, जिवनराव गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, जिल्हा नेते संजय निंबाळकर, प्रा. संजय कांबळे, प्रतापसिंह पाटील, शहराध्यक्ष अय्याज शेख, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, महिला अध्यक्षा मनिषाताई राखुंडे, युवती जिल्हाध्यक्ष  श्वेताताई दुरुगकर, सांस्कृतीक जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, जेष्ठ नेते आर.डी.सुळ, बाबाभाई मुजावर, मृत्युंजय बनसोडे, तालुका अध्यक्ष-ॲङ संदीप खोसे, हनुमंत पाटूळे, धैर्यशील पाटील, श्याम घोगरे, संजय पवार, सुरेश टेकाळे, मुस्सदीक सिद्दीकी, रंजीत गायकवाड, युवक प्रदेश चिटणीस रोहीत बागल, मजहर शेरीकर, आदित्य गोरे, तुषार वाघमारे,रणजीत वरपे, नशिरशहा बफीर्वाले यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top