तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील कसई शिवारात रुपा पेट्रोल पंपाचे डिझल टाकीतुन 1,67,877 रुपये रकमेचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना गुरुवार दि. 5 ऑक्टोबर रोजी राञी घडली. 

अधिक माहिती अशी की, अमित तानाजी तांबे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर ह.मु. पंचायत समितीच्या पाठीमागे तुळजापूर जि. धाराशिव यांचे बहिणीचे नावावर असलेल्या गट नं 07 कसई शिवार येथील रुपा पेट्रोलियम पंपाचे डिझेल टाकीतुन  अंदाजे 1,67,877 रूपये किंमतीचे 1803 लि. डिझेल हे दि. 05.10.2023 रोजी 24.00 ते दि. 06.10.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा फिर्याद तांबे यांनी दि.06.10.2023 रोजी दिल्या वरुन तुळजापूर पो. ठाणे येथे  भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top