नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दि.10 ऑगस्ट रोजी नेत्र तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले होते. यातील 150 नागरीकांना दि.9 सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या हस्ते चष्म्याचे वाटप करण्यात आले.

श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दि.10 ऑगस्ट रोजी स्व. रघुवीर प्रसाद जोशी महाराज यांच्या कृपेने व श्रीक्षेत्र रामतीर्थचे महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील नामांकीत शिवम ऑप्टिक्स, लेडीज सर्कल इंडिया तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. सत्यजित डुकरे व नळदुर्ग येथील नेत्र चिकित्सक डॉ. आनंद काटकर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले होते.यावेळी नेत्र तपासणी केल्यानंतर ज्यांना नंबरच्या चष्म्याची गरज आहे अशांची यादी तयार करून त्यांचे चष्मे तयार करण्यासाठी देण्यात आले होते.

शनिवार दि.9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे हनुमान चालीसाचे पठण झाल्यानंतर महंत श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांच्या हस्ते नागरीकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. यावेळी 150 नागरीकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बसवराज पाटील महाराज (हैद्राबाद),श्री शुक्ला महाराज, रामभक्त श्रमिक पोतदार, प्रभाकर घोडके, श्रीकांत पोतदार, जमन ठाकुर, बाबुराव राठोड, लखन भोसले यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नंबरचा व अतीशय चांगल्या दर्जाचा चष्मा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराचा गरीब नागरिकांना मोठा फायदा झाला आहे.


 
Top