नळदुर्ग (प्रतिनिधी)- शिवशक्ती परीक्रमा या दौऱ्याअंतर्गत पंकजाताई मुंडे देवदर्शन व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी सध्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने नळदुर्ग येथील बसस्थानकासमोर नळदुर्ग भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
प्रारंभी नळदुर्ग शहरात पंकजा मुंडे यांचे आगमन होताच भाजपा कार्यकर्त्यांनी बसस्थानक समोर फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे स्वागत केले.
मराठा आरक्षणासाठी उमरगा येथील तरुणाने आत्महत्या केली असल्याने त्या तरुणांप्रती सद्भावना व्यक्त करीत आपण हारतुरे स्वीकारणार नसल्याचे यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यानंतर नळदुर्ग शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, संजय जाधव, छमाबाई राठोड, सुनील चौधरी, सागर हजारे यांनी रामतीर्थ देवस्थान नळदुर्ग, खंडोबा मंदिर व नळदुर्ग किल्याची प्रतिमा पंकजा मुंडे यांना भेट म्हणुन दिली.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे सदस्य प्रवीण घुगे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, युवा मोर्चा चे शहराध्यक्ष गणेश मोरडे, अजय देशपांडे, आनंद लाटे, अक्षय भोई, मुदस्सर शेख, किरण दुस्सा, शुभम हजारे, अबुलहसन रिझवी यांच्यासह नागरीक उपस्थित होते.