तेर (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमलात येत असलेल्या आयुष्यमान भव आरोग्य योजनेचा शुभारंभ ग्रामीण रूग्णालयात सरपंच दिदी काळे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड,वैद्यकीय अधिक्षका डॉ.नागनंदा मगरे,रूग्ण कल्याण समितीचे सदस्य, सुभाष कुलकर्णी, जुनेद मोमीन, ग्रा.प.सदस्य अजीत कदम, डॉ.संगमेश्वर धोंगडे,डॉ.स्नेहल क्षिरसागर, डॉ.साजीद शेख अधिपरिचारिका संगिता चव्हाण, दत्तात्रय वाघे उपस्थित होते. यावेळी डॉ.मगरे यांनी उपस्थित महिलांना या त्रिस्तरीय आरोग्य योजनेची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ.संगमेश्वर धोंगडे यांनी केले.