धाराशिव (प्रतिनिधी) -येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीचे प्रा. डॉ. किशोर फुले हे लाभले होते. डॉ. किशोर फुले यांनी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे संविधान व शैक्षणिक कार्य आणि कर्तृत्व यावर सखोल प्रकाश टाकला. सर्वप्रथम श्री शिवाजी महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी सदर कार्यक्रमाचे स्वरूप समजावून सांगितले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, कर्मवीर भाऊराव पाटील ,डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. सदर कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सतीश तराळ हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले ,सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रेय साखरे यांनी केले. तर आभार डॉ. केशव क्षीरसागर यांनी मांनले. सदर कार्यक्रमासाठी डॉ. संदीप देशमुख, डॉ. मारुती लोंढे डॉ.अरविंद हंगरेकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमासाठी डॉ.एस.एस. फुलसागर व मोठ्या संख्येने विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.