धाराशिव (प्रतिनिधी)- एका बाजुला पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचे पिक वाळुन जात आहे, तर दुसऱ्या बाजुला पर्यायी स्त्रोताद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला तर महावितरणकडुन विज उपलब्ध होत नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने यापुढे विजपुरवठा सुरळीत न केल्यास कोणाची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी माझ्या अंगावर किती केसेस झाल्या तरी मी त्याची पर्वा करणार नाही याची नोंद कंपनीने घ्यावी असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला आहे. सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी लोकशाही मार्गाने महावितरणच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

जून, जुलै महिन्यामध्ये पावसांची टक्केवारी अत्यंत कमी होती. तर ऑगस्ट पुर्णतः कोरडा गेल्याचे चित्र आहे. जेव्हा पिकाला पाण्याची आवश्यकता आहे तेव्हाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पाण्याअभावी पिके सुकुन वाळु लागली आहेत. अशावेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे अन्य स्त्रोत आहेत त्यांनी पिकाना पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हा तिथे वीज उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. असंख्य शेतकऱ्यांकडुन या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

 आंदोलन करणार

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकशाही मार्गाने महावितरणच्याविरोधात धरणे आंदोलन सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी करणार असून, या आंदोलनात आमदार कैलास पाटील, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शेतकरी, शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. 


 
Top