धाराशिव (प्रतिनिधी) - हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिरात हैद्राबाद मुक्तिसंग्राम संदर्भात व्याख्यानाचे आयोजन दि.13 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचलित, धाराशिव प्रशाला उस्मानाबाद व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यालयीन सचिव बी आर सुर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून  संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव, संस्थेचे सचिव दिलीपराव गणेश, संस्थेचे कोषाध्यक्ष उमाजीराव देशमुख, प्रमोद डांगे, प्रकाश तोडकरी आदी उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब जाधव यांनी हैदराबाद संस्थानांमधून मराठवाडा कसा मुक्त झाला ? याची सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सी.एन. माळी यांनी तर उपस्थितांचे आभार एम.एस. सुरवसे यांनी मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.एस. जाधव, एक.आर. माडेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून भोसले व सोनवणे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.


 
Top