धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा समाजाला दिशाभूल करून दिलेला शब्द नको त्यांना खरेखुरे सच्चे मराठा आरक्षण पाहिजे असे मत भाजपच्या माजी मंत्री तथा राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

पंकजा मुंढे गेली दोन दिवस धाराशिव जिल्ह्यात होत्या. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व विभाग मोर्चापासूनचे जवळचे कार्यकर्ते दत्ता कुलकर्णी यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकारांशी बोलताना मुंढे यांना पत्रकारांनी विचारले की, मराठा आरक्षण चळवळ गेल्या 12 दिवसापासून सुरू आहे. अद्यापही तोडगा निघत नाही, यावर सरकार कोठे कमी पडते का? या संदर्भात विचारले असता पंकजा मुंढे यांनी मराठा समाजाला आता दिशाभूल करून दिलेला शब्द नको आहे. खरे आणि सच्चे आरक्षण पाहिजे. हे आरक्षण किती बसते याचा सरकारकडे आराखडा ही असतो. यासंदर्भात सरकारने हिमंतीने व विश्वासाने मराठा समाजाबरोबर चर्चा करावी असे सांगितले. 

यावेळी भाजपचे दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, संताजी चालुक्य यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ओबीसी आणि मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरवू नका 

यावेळी पत्रकारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध आहे का? असे विचारले असता पंकजा मुंढे यांनी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. दिशाभूल करून दोन्ही समाजात अस्वस्थता पसरवू नका असे सांगून मुंढे यांनी कोणता वर्ग म्हणले आमच्यातून आरक्षण द्या? त्यामुळे ओबीसी व मराठा समाज असा विषय नाही असे सांगितले. 


छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक

धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजातील एका युवकाने आत्महत्या केल्याबद्दल बोलताना पंकजा मुंढे यांनी आत्महत्या करू नका. तुम्ही छत्रपती शिवाजी महाजारांचे सैनिक आहात. वाघासारखे लढा. तुमची ही लढाई येणाऱ्या पिढीला कामाला येईल असे सांगितले.


 
Top