उमरगा (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील माडज येथील एका युवकाने गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. त्यानंतर गावात तणावाचे वातावरण होते. गुरुवारी  सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत टेम्पो मधून आणून उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय उमरगा समोर श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान शहर व उमरगा तालुक्यात आजही कडकडीत बंद पाळण्यात आला. तणावाच्या वातावरणात किसन मानेवर माडज येथे अत्यसंस्कार करण्यात आले.           

माडज गावातील तरुण किसान चंद्रकांत माने वय 35 याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे व आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यासाठी मी जीव देत आहे असे म्हणत गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाला आरक्षणाबाबत लेखी हमी दिल्याशिवाय शवविच्छेदन करणार नाही अशी भूमिका रात्री उशिरापर्यंत घेतली होती. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते.                                     

आज गुरूवारी सकाळी माडज गावातील एका टेम्पो मधून उपजिल्हा रुग्णालयात पार्थिव शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी तरुणांनी मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी केली व अनेकांनी आरक्षणावर मनोगत व्यक्त केले. तहसील कार्यालयासमोर ही श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मराठा आरक्षणाबाबत संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना नेते बाबा पाटील, किरण गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार, कैलास शिंदे दिलीप भालेराव संजय पवार बसवराज वरनाडे बाजार समितीचे सभापती रणधीर पवार शहापुरे बळी मामा सुरवसे विजय कुमार नागणे सुधाकर पाटील विनायकराव पाटील आदीसह  विविध संघटनांचे पदाधिकारी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.           


 
Top