तुळजापूर (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानीच्या आशिर्वादामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित राहु शकलो असे सांगुन आज माझी ख-या अर्थाने शक्तीपीठ परिक्रमा पुर्ण झाल्याचे प्रतिपादन पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा निमित्ताने श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर मंदिर समोर आयोजित जाहीर सभेत केले.              

यावेळी व्यासपीठावर अर्चनाताई पाटील, प्रविण घुगे, दत्ता कुलकर्णी, विशाल रोचकरी, सचिन रोचकरी, विनोद गंगणे, नितीन काळे सह भाजप पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या कि, सत्य आणि सत्य ऐवढेच मला पाहिजे. आई भवानी मातेने मला सत्या पासुन ढळु न देण्याचा शक्ती, आशिर्वाद द्यावी ऐवढेच देवि समोर मागण असल्याचे सांगितले. छञपती शिवाजी महाराज यांनी अन्याय, अत्याचाराचा प्रतिबंध घालण्यासाठी स्वराज्य निर्माण केले.  भविष्यात घोषणा देवुन लाईक करुन चालणार नाही असे यावेळी म्हणल्या या जिल्हयात ऐका युवकांनी आत्महत्या केल्याने मी सत्कार स्विकारणार असेही यावेळी सांगुन सत्कार स्विकारण्यास नकार दिला.


 
Top