धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा कार्यालय धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुळजापूर तालुक्याची सभासद नोंदणी,शपथपत्र  संदर्भात महत्त्वाची बैठक  खेळीमेळीच्या उत्साही वातावरणात पार पडली.

या बैठकीला तालुका व शहर चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरात लवकर अचूकपणे भरलेले शपथपत्र देण्याविषयी जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांना सूचना केल्या. तालुका व शहरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने लवकरात लवकर अचूकपणे भरलेले पक्षाचे शपथपत्र आपण जिल्हा पक्ष कार्यालयात जमा करू असे सर्वांच्या संमतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांना सांगण्यात आले. 

यावेळी सामाजिक न्याय सेल जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार, मलंग शेख, बबन गावडे, केशेगाव जि प गटप्रमुख लिंबराज लोखंडे, नितीन आबा रोचकरी, समाधान ढोले, विकी घुगे, अनमोल शिंदे,विनोद जाधव, वैभव शिंदे, शशी नवले, गोविंद देवकर, मनोज माडजे, अभय माने, सुधीर मगर, फिरोज पठाण, सोहेल बागवान,बालाजी पेंदे, सुभाष कदम, सोहेल शेख, भारत गायकवाड, अमोल तांबे, बसवन्नाप्पा मसुते आधी पदाधिकारी सहकारी व अजित दादा राष्ट्रवादी प्रेमी उपस्थित होते.


 
Top