धाराशिव (प्रतिनिधी)- श्रावण मास निमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्यावतीने भीमाशंकर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. सदरील दर्शन यात्रा दि.05/09/2023 रोजी तुळजापूर येथून पहाटे 4.30 वा. निघणार असून त्याच दिवशी रात्री 10.00 वाजेपर्यंत परत निघणार आहे.

श्रावण महिन्यानिमित्त यावेळी तुळजापूर तालुक्यातील भाविक महिलांना बारा जोतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकर देवस्थान ता.अंबेगाव.जि. पुणे येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक बस या प्रमाणे 9 बसेसची सोय करण्यात आली आहे.

तरी शहापूर, नंदगाव, जळकोट व अणदूर गटातील नोंदणी केलेल्या महिला भाविकांनी नळदुर्ग येथील बसस्थानकावर तर काक्रंबा, सिंदफळ, मंगरूळ, काटी, काटगाव गटातील नोंदणी केलेल्या महिला भाविकांनी तुळजापूर शहरातील नवीन बसस्थानक शेजारील भाजपा संपर्क कार्यालय येथे वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.


 
Top