नळदुर्ग (प्रतिनिधी)- अखिल भारतीय शिक्षक संघातर्फे जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी भारत संघर्ष यात्रा संपुर्ण देशभरात काढण्यात आली आहे. देशाच्या चार सीमा वरून यात्रा निघणार असुन सर्व राज्यात जनजागृती करत 5 ऑक्टोबरला फोर्ट ऑडीटोरीअम दिल्ली येथे समारोप होणार आहे.यातील दोन यात्रा महाराष्ट्रातुन जाणार असुन शिक्षकांसह कर्मचारी संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बस्वदे व राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर यांनी केले आहे .

गुजरात मधून निघणारी यात्रा 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात नवापुर येथे प्रवेश करणार असुन नंदुरबार ,धुळे, जळगाव मार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात जाईल. कन्याकुमारी येथुन निघणारी यात्रा गोवा मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 सप्टेंबरला प्रवेश करणार असुन कोल्हापुर, सातारा ,धाराशिव, तुळजापूर येथे दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वा. पुजारी मंडळ तुळजापुर येथे येत आहे.या ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त  जुनी पेन्शन धारक शिक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.ही यात्रा पुढे लातुर, नांदेड, वाशिम, अमरावती ,नागपुर मार्गे मध्यप्रदेश कडे रवाना होणार आहे. ठीक ठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात येईल. बाईक रॅली, सभा, मेळाव्याचे आयोजन केले आहे. सन 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मागणी यात्रेच्या माध्यमातुन करण्यात येत आहे .शिक्षण क्षेत्रातील इतरही मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. भारत संघर्ष यात्रेत जिल्ह्यातील शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक नेते श्री लालासाहेब मगर ,श्री दत्ता मोहिते ,अविनाश मोकाशे, मोहन लष्करे, शिवाजी साखरे, डी एस  वाघमारे, तानाजी शेळके ,अमीन शेख ,दत्ता माळी, सोमनाथ केवटे ,कैलास मोहिते, दत्ता माळी ,राजाभाऊ आकुसकर ,नागनाथ मुडबे ,एन टी आदटराव, शेकु जेटीथोर,उमेश भोसले, विठ्ठल जेटीथोर ,आप्पा जाधव, सी. बी. स्वामी,युवराज जाधव यांनी केले आहे.


 
Top