धाराशिव  (प्रतिनिधी) - एखाद्या व्यक्तीचे काम करून देण्यासाठी फक्त पैसे घेणे हा भ्रष्टाचार नाही. तर रेशन मधील धान्य बेसन पाणी बॉटल दूध भेसळ आधी सह विविध बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे तो मुळासकट उखडून टाकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरोचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष असलम शेख यांनी दि.१९ ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरोच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष लालासाहेब दुनघव, कानिफनाथ देवकुळे,  खालिद काझी, बीड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटुळे, उपाध्यक्ष भागवत वराट, जिल्हा सचिव कांताबाई जगताप, अर्चना कांबळे, सोमनाथ लांडगे, राज्य सचिव रवींद्र पाटोळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शेख म्हणाले की, नॅशनल अँटीकरप्शन अंड क्राईम कंट्रोल ब्युरो (निती आयोग संचलित) या संघटनेच्या माध्यमातून पोलिसांना देखील सहकार्य केले जात आहे. तर महिला अत्याचार, बालविवाह याबाबतीत देखील कायद्याच्या चौकटीत राहून ही संघटना काम करीत आहे. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचे स्वरूप अतिशय भयानक असल्यामुळे यापासून सर्वांचीच मुक्तता करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आदित्य गोरे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राम तेरकर, लालासाहेब दुनघव, भागवत वराट आदींसह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अमर कांबळे, कुंदन शिंदे, अमोल कसबे, रेहान पटेल, अभिजीत देवकुळे  आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी तर उपस्थितांचे आभार शशिकांत सोनवणे यांनी मानले.

.......................

नॅशनल अँटी करप्शन अंड क्राईम कंट्रोल ब्युरो संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी संभाजी कांबळे यांची तर महिला जिल्हाध्यक्षपदी ॲड अर्चना कांबळे यांची निवड करण्यात आली. यावेळी असलम शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र, पुष्पहार व शाल देऊन कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
 
Top