धाराशिव (प्रतिनिधी)- लेडीज क्लब धाराशिव आयोजित, मंगळागौरी स्पर्धेला जिल्हाभरातून नाहीतर बाहेरूनही महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत विक्रमी गर्दी केली. लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी यंदा लेडीज क्लबच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते.

सायंकाळी 6 वाजता संपूर्ण लेडीज क्लबचे मैदान गर्दीने फुलून आले होते. या कार्यक्रमाला लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या सुविद्य पत्नी सौ. ओंबासे आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. महिमा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

या मंगळागौर स्पर्धेत 50,000 रुपये  रोख प्रथम पारितोषिक ढोकी येथील आशा प्रवर्तक ग्रुप, तुळजापूर येथील महालक्ष्मी माहेरवाशिन ग्रुप तर लोहारा येथील सप्तशृंगी ग्रुप यांच्यात विभागून देण्यात आले. तर 30,000 हजार रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक तुळजापूर येथील टाटा ग्रुप, येरमाळा येथील येडेश्वरी ग्रुप तर येडशी येथील ओळख स्वतःची या ग्रुपला विभागून देण्यात आले. तर तिसऱ्या क्रमांकावर धाराशिव येथील महसूल रणरागिणी ग्रुप, धाराशिव येथीलच रॉयल ग्रुप आणि वाशी येथील अजिंक्य टीचर्स ग्रुप यांना 20,000 रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले. या स्पर्धेत 23 ग्रुपने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवि केसकर यांनी केले.



 
Top