तुळजापूर (प्रतिनिधी)-स्वराज्य संघटना तुळजापूर तालुका यांच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त काक्रंबा येथे भव्य रक्तदान शिबिर,अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप,भव्य वृक्षारोपण,आणि मोफत सर्वरोग निदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला.

प्रसंगी प्रतिमेचे पूजन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली  यावेळी एकूण 31 रक्तदात्यानी रक्तदान केले. व उपस्थित तज्ञ डॉक्टरांनी  500 हून अधिक लोकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात केले तसेच गावातील संजीवनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शाळेत शिकत असलेल्या 60 अनाथ विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच विविध प्रकारचे 200 झाडे लावण्यात आली.

यावेळी  गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, स्वराज्य संघटनेचे मराठवाडा प्रवक्ते जीवराजे इंगळे, राज्यकार्यकारिणी सदस्य बाबा रोटे, जिल्हाप्रमुख  महेशजी गवळी, स्वराज्य  प्रशांतजी अपराध, कुमार टोले, मुख्याध्यापक देवगुंडे सर, मुख्याध्यापिका उंबरे मॅडम, काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ, संतोष सुरवसे सह ग्रामस्थ, स्वराज्य संघटनेचे मावळे, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी काक्रंबा शाखेने अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमार टोले तर आभार सत्यजीत साठे यांनी मानले.

 
Top