तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नगर परिषदेच्या वतीने ’मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत नगरपालिकेच्या वतीने 75 देशी जातीच्या वृक्षांची लागवड जलशुद्धीकरण केंद्र येथे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी सदर वृक्षांची जोपासना करुन शहरातील विविध भागातील नागरिकांना आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व जोपासना करावी असे आवाहन श्री.सचिन रोचकरी यांनी केले. तर मुख्याधिकारी यांनी शासनाच्या ’मेरी माटी मेरा देश’ या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्याचाच एक भाग म्हणून वृक्ष लागवडीचे महत्व विशद केले. सदर प्रसंगी कार्यालय अधीक्षक वैभव पाटील प्रशांत चव्हाण स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंखे लिपिक विशाल लोंढे, प्रमोद माळी, सुनील पवार,महादेव शिंदे, विश्वास मोटे इत्यादी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.