धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयातील माजी संगीत संगीत शिक्षक मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष जिल्हा संस्कार भारती जिल्ह्याचे भुषण पं. दिपक धोंडीराम लिंगे यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्यावतीने पंडित विष्णु दिंगबर पलुस्कर यांच्या 150 जयंती निमित्त संगीत क्षेत्रात भरीव योगदान देण्यार्या 151 संगीत तज्ञ संगीतशिक्षकांपैकी पं. दिपक लिंगे हे पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार 2023 -24 चे मानकरी ठरले आहेत.
हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा 19 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई वाशी कला साहित्य संस्कृती व कला मंडळ येथे समारंभ पूरक मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. हा पुरस्कार पं. लिंगे यांना जाहीर झाल्याबद्दल जिल्हा संस्कार भारतीचे पदाधिकारी शेषनाथ वाघ, अनिल ढगे, श्यामसुंदर भन्साळी, प्रभाकर चोराखळीकर, सुरेश वाघमारे, शरद वडगावकर, रवींद्र कुलकर्णी, अरविंद पाटील आदि मान्यवर सदस्य समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.