धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांचा धाराशिव जिल्ह्यात दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता आगमन होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन मराठवाडा दौर्यात सुरुवात करणार आहेत.
यावेळी ते धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक देखील सकाळी अकरा वाजता घेणार आहेत. त्यांच्या समवेत तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश चिटणीस रंगनाथ सोळंके, रामदास कोळगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश देशमुख, नानासाहेब यादव इत्यादी मान्यवर बैठकीस हजर राहणार असून जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने तुळजापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे असे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी कळविले आहे.