धाराशिव (प्रतिनिधी)- बालकांमधील मृत्यु व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की अर्धवट लसीकरण झालेले, लसीकरण न झालेले बालके ही पूर्ण लसीकरण झालेले बालका पेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यूमुखी पावतात. या अनुषंगाने जिल्हयात आज सर्व ठिकाणी विशेष मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येत असून ही मोहिम एकूण तीन टप्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात 7 ते 12 ऑगस्ट  दुसरा टप्पा  11 ते 16 सप्टेंबर  तिसरा टप्पा 9 ते 14 ऑक्टोंबर या तिनही टप्या दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील अर्धवट किंवा गळती झालेल्या बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर सदर मोहिम बाबत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना- 1 वैराग रोड येथे विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 लसीकरण मोहिमेचे  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी फित कापून उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास,  जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉ. शकील खान सह उपस्थित होते.


 
Top