उमरगा(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील महिलांचें मतदार नोंदणीचे प्रमाण कमी झाले आहे पुरुष मतदार संख्येच्या तुलनेत एक हजारांमागे  925 एवढे आहे. महिलांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाविद्यालयात होणार्‍या प्रवेश प्रक्रिये कालावधीत प्राचार्याच्या मदतीने विशेष मतदार नोंदणी अभियान राबवून शंभर टक्के मतदान नोंदणी करण्यासाठी कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे यांनी केले.

शहरातील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (दि.14 )रोजी आयोजित करण्यात आलेल्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी (एएलए)यांची कौशल्य वृद्धी उत्पादकता वाढविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अँपचें एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे, लोहारा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार राजाराम केरूरकर, रतन काजळे, प्रशिक्षक दिग्विजय गायकवाड यांची उपस्थिती होती.

यावेळी शहरातील तृतीय पंथीयांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात आला. संजय गांधी योजनेचा लाभ, बँकेत खाते काढणे, पॅन कार्ड, अंत्योदय लाभाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तृतीय पंथीयांना देण्यात आले. यात माया पटेल, सरीना पटेल, निहा सरीना पटेल, पिंकी पटेल, रविना मंडले, गौरी घोडके, निकिता पांढरे आदींना याचा लाभ देण्यात आला.

या कार्यशाळेला तालुक्यातील विविध पक्षाचे अध्यक्ष, सचिव, विधानसभा अध्यक्ष पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार नोंदणी काळात शाळेकडे दुर्लक्ष होणार नाही व शाळा बंद पडणार नाही याची दक्षता घेऊन शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, महसूल कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.


 
Top