धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताजमहल टॉकीज, धाराशिव येथे लेडीज क्लबच्या वतीने  ’बाईपण भारी देवा’ या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या मोफत स्क्रिनिंगचा शुभारंभ करण्यात आला. यास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महिलांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा जिल्हा संयोजक नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, राजकुमार पाटील, विष्णू नारायणकर, भारत डोलारे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती.

या चित्रपटाने महाराष्ट्रभरातील महिलांना एक वेगळा सोहळा साजरा करण्याची संधी दिली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माता-भगिनी निराळा उत्साह, चैतन्य आणि आनंद अनुभवत आहे.

दिनांक 29 जुलै व 30 जुलै  रोजी ताजमहल टॉकीज, धाराशिव, जवाहर टॉकीज, तुळजापूर तसेच पृथ्वीराज टॉकीज, कळंब येथे दि.1  व 2 ऑगस्ट रोजी 2 दिवस प्रत्येकी 3 शो महिलांसाठी मोफत दाखविण्यात येत आहे. महिला-भगिनींनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन लेडीज क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top