तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात सध्या शहरासह ग्रामीण भागात चोरांचा सुळसुळाट वाढल्याने अपसिंगा ग्रामवासियांनी या चोरांपासुन संरक्षणासाठी रोज चार ग्रामपंचायत सदस्य व एक कर्मचारी असे पाच जण राञी गस्त घालण्यासाठी पोलिसांनी परवानगी द्यावा या आशयाचा ठराव ग्राम पंचायत च्या मासिक सभेत घेण्यात आला. 

अपसिंगा ग्रामपंचायतची मासिक बैठक सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अजित क्षिरसागर अध्यक्षतेखाली उपसरपंच राहुल साठेच्या उपस्थितीत घेण्यात आलीयात गावातील चोरांचा सुळसुळाट वर चर्चा झाली. अखेर दररोज राञी चार ग्रामपंचायत सदस्य व एक कर्मचारी अशा पाच जणांनी दररोज गावात राञी गस्त घालण्याचा निर्णय घेण्यात आला.  या गस्त परवानगीसाठी ग्रामपंचायतवतीने पोलिस निरीक्षक यांना ग्रामपंचायत वतीने निवेदन देण्यात आले.

या बैठकीला आबा भगवान गुरव, सचिन गुलाबराव जाधव, अहमद रशीद काझी,  शरद अर्जुन क्षिरसागर, दिनेश बाळासाहेब गोरे, राहुल महादे गोरे, सचीन सुग्रीव सोनवण,े सचिन प्रकाश रोंगे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थिती होते. या बैठकीचे सुञसंचलन ग्रामसेवक एल. के. सुरवसे यांनी केले.

 
Top