धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पासून जवळच असलेल्या स्वआधार मतिमंद केंद्रात 112 मतिमंद मुली आहेत. अक्षरवेल मंडळातर्फे आज या शाळेच्या परीसरात अंजिराचे 100 झाडे लावून दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात अक्षरवेलच्या नूतन अध्यक्षा डॉ.सुलभा देशमुख म्हणाल्या की, यापूर्वीही या केंद्रामध्ये आंब्याच्या वृक्षाचे रोपे लावून दिली असून या संस्थेने सामाजिक भान जपत जे कार्य सुरू केले आहे त्यात खारीचा वाटा म्हणून अक्षरवेल महिला मंडळातर्फे अंजिराचे वृक्ष लावून देत आहोत. याचा निश्चितच या मुलींना फायदा होईल. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अक्षरवेलच्या कार्याध्यक्ष कमलताई नलावडे, डॉ.रेखा ढगे, डॉ. अनार साळुंखे, किरण देशमाने, अपर्णा चौधरी, स्नेहलता झरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. रेखा ढगे, प्रा.सुनीता गुंजाळ यांनी उपस्थित मतिमंद मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मीना महामुनी, डॉ.सोनाली दीक्षित, जयश्री फुटाणे यांनी यावेळी कविता सादर केल्या. या शाळेमध्ये इतक्या मतिमंद मुली असूनही गेल्या दहा वर्षात कधीही गैरप्रकार झाला नसून शाळेचा नावलौकिक असल्याचे तेथील प्रशासनाने नमूद केले. या कार्यक्रमासाठी अक्षरवेलच्या मीनाताई महामुनी, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ.सोनाली दीक्षित, सुमित्रा आटपलकर, तावडे ताई, शिवनंदा माळी, ज्योती मगर, जयश्री फुटाणे, सविता माळी यांनी परिश्रम घेतले व वृक्षारोपण केले. यावेळी या शाळेच्या शिक्षिका श्रीमती कुदळे, वैशाली पोफळे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.सुनीता गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले.