धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर नगर पालिकेतील अनुकंपा तत्वावर नियुक्त्यावर कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे. याच प्रकरणात तुळजापूर पालिकेतील लिपीक प्रफुल्लता बरूरकर यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे.
धाराशिव आणि तुळजापूर नगरपालिकेतील बहुचर्चित अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या वादग्रस्त ठरल्या आहेत. आणि तुळजापूर नगरपालिकेत 2022 मध्ये एकूण 12 कर्मचार्यांचा अनुकंपा तत्त्वावर नियु्नत्या केल्या होत्या. यामध्ये धाराशिव पालिकेतील 3 तर तुळजापूर पालिकेतील 9 कर्मचार्यांचा समावेश होता. जिल्हाधिकार्यांच्या नियुक्त त्रिसदस्यीय समितीने या नियुक्त्या करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला होता. या सर्व कर्मचार्यांना कार्यमु्नत करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी 14 जुलै रोजी दिले होते. या कर्मचार्यांनी अॅड. दिलीप मराठे यांच्या मार्फत लातूर येथील कामगार व औद्योगिक न्यायालयात धाव घेत स्थगतिी मिळवली आहे. सुनिल पवार, धीरज भांजी, बालाजी जाधव, बबलू क्षीरसागर, सुरेश क्षीरसागर, अमोल ढाले, पूजा एखंडे या कर्मचार्यांना कामावरून तूर्त कमी न करण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत.