धाराशिव (प्रतिनिधी)-ज्ञानेश्वर मंदिरा मागील टेकडीच्या परिसरामधे मागिल पंधरा दिवसानंतर आज रविवारी कचरा गाडी अवतरली होती. क्विंटलावर कचरा पोत्यामधे भरुन ठेवून,  दुर्गंधीयक्त वातावरणात सदर भागातील नागरिक सध्या रहात आहेत. किमान भविष्यात सुधारणा व्हावी या आशेने, परिसरातील रहिवाशानी घंटागाडी कर्मचार्‍रांचे पुष्प गुछ देवून उपहासात्मक स्वागत केले आहे.

नपची राजकिय पदाधिकार्‍रांची बॉडी बरखास्त झाल्यापासून, मागिल वर्षभरापासुन नागरिकाना हा त्रास कायमच सहन करावा लागत आहे. नप  श्रीमती फड या तरूण व हुशार असल्याने, नप कारभारामधे सुधारणा होइल असे वाटले होते. त्या आपेक्षेने फूक संघटनेने त्यांचा सत्कारही केला होता. परंतू  ची प्रशासासनावर कसलिही पकड नसल्याचे आता सिध्द झाले आहे. त्याचा अतोनात त्रास उस्मानाबाद शहरातील नागरिकाना सहन करावा लागत आहे.

नपचा कारभार नाही सुधारल्यास, नागरिकांचे प्रश्न घेवुन फूक संघटना लवकरच आंदोलन करेल असे फुक  संघटनेचे सचिव धर्मवीर कदम यांनी सांगितले. 

 
Top