नळदुर्ग (प्रतिनिधी)- आषाढी एकादशी निमित्त दि. 29 जुन रोजी मराठा गल्ली येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळाच्या वतीने शहरांतुन माऊलीची भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शहरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाल वारकर्‍यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीसह विविध संतांच्या वेशभुषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते.

दि. 29 जुन रोजी संपुर्ण राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. नळदुर्ग शहरातही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठा गल्ली येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शहरांतुन भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. मराठा गल्ली येथुन सुरू झालेली पालखी मिरवणुक पांचपीर चौक, भोई गल्ली, क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, राममंदिर, सावरकर चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे मराठा गल्ली अशी काढण्यात आली. यावेळी भजनी मंडळाचे भजन, अभंग यासह पंढरीनाथ महाराज की जयच्या जयघोषात ही मिरवणुक निघाली. पालखी मिरवणुक निघाल्यानंतर माऊलीचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक चौकात नागरीकांनी गर्दी केली होती. वसंतराव अहंकारी गुरुजी यांच्या निवासस्थानी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी पांडुरंगाची पुजा करण्यात आली. यावेळी अहंकारी यांच्यावतीने नागरिकांना केळीचे वाटप करण्यात आले.

नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी माऊलींची पालखी खांद्यावर घेण्याबरोबरच पालखी मिरवणुकीसमोर फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला. यावेळी बलभीमराव मुळे, पोलिस उपनिरीक्षक पटेल, माजी नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, महालिंग स्वामी,सरदारसिंग ठाकुर ज्योतीबा येडगे यांनीही फुगडी खरळण्याचा मनमुराद आनंद लुटला.

पालखी मिरवणुकीत श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळाचे सुक्ष्म माने, सुभद्राताई मुळे, सुमन किल्लेदार, विमल काळे, सरुबाई महाबोले,छायाबाई मुळे, शोभा ठाकुर,लक्ष्मी किल्लेदार, अरविंद माने, दौलतराव खाटमोडे,नेताजी किल्लेदार, मिलिंद भुमकर,महेश कलशेट्टी, मोहीत कलकोटे,गुंडू जगताप, तानाजी जाधव, ज्ञानेश्वर गव्हाणे, किसन जाधव, जगन्नाथ गायकवाड, बळीराम पाटील, कोंडीबा जाधव यांच्यासह माजी नगरसेवक सुधीर हजारे, विलास येडगे, सुहास येडगे, तानाजी जाधव, उमेश जाधव, रमेश जाधव, रघुनाथ नागणे, संजय विठ्ठल जाधव, बंडप्पा कसेकर, अमोल सुरवसे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी मिरवणुक मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


 
Top