तुळजापूर / प्रतिनिधी-

 कोरोना व,एसटी संपामुळे एस टी पासुन दूर गेलेला प्रवासी भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारने जाहीर केलेल्या  अमृत जेष्ट नागरिक योजना व महिला सन्मान योजने मुळे पुन्हा एस कडे परतु लागला असुन ही एस टी साठीनवसंजीवनी ठरत आहे.

सध्या दैनंदिन १८कोटी पेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त होत आहे. तुळजापूर -कोव्हीड- १९ व रा.प. कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपामुळे  महाराष्ट्रराज्यपरिवहनमहामंडळ सेवा विस्कळीत झाली होती माञ भारतच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अमृत जेष्ट नागरिक व महिला सन्मान योजने या दोन योजना राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेमुळे प्रवासी मोठ्या संखेने आकर्षित झाल्याने या दोन्ही योजना महाराष्ट्रराज्यपरिवहनमहामंडळ साठी नवसंजीवनी योजना ठरल्या आहेत.

सदर योजनेस महिलांचाही अभूतपुर्व प्रतिसाद मिळत आहे.सदर दोन्हीही योजना रा.प. महामंडळासाठी नवसंजीवनी ठरत असून रा.प. महामंडळातून प्रवास   करण्या-या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ  होऊन कोव्हीड- १९ पुर्वी असणारी महामंडळाची प्रवासी संख्या लवकरच महामंडळ प्राप्त करेल अशी खात्री  निर्माण झाली आहे. उन्हाळी जादा गर्दीचा हंगाम २०२३ साठी रा.प. महामंडळाने केलेल्या नियोजनानुसार बंद असलेलीवाहने मार्गावर आणून व प्रवाशांना जास्तीत जास्त रा.प. बसेस उपलब्धता करुन देण्यास रा.प. कर्मचारी व अधिकारी करत असलेले प्रयत्न हे कौतुकास्पद असले तरी त्यामध्ये अजून बराच वाव असल्याचे दिसून येते.  स्वच्छतेबाबत महामंडळ

स्तरावर दि. ०१ मे, २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत स्वच्छ सुंदर बसस्थानक हे अभियान सुध्दा

राबविण्यात येत असून यामध्ये अ, ब, व क श्रेणीनुसार आगार व विभागांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.उन्हाळी गर्दीच्या हंगामात सलग सुट्टी कालावधीमध्ये उपलब्ध बसेस व मनुष्यबळाच्या आधारावरसर्व विभागांतील रा.प. चालक / वाहक, यांत्रिकी व इतर सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे रा.प. महामंडळाचे सरासरी दैनिक उत्पन्न १८ कोटीपेक्षा जास्त प्राप्त होत आहे.


 
Top