धाराशिव / प्रतिनिधी-

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सरकार वरील महत्वपुर्ण निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकार हे कायदेशीर असल्याचे सिध्द झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

बावनकुळे गुरूवार दि. ११ मे रोजी धाराशिव शहरात बुथ सशक्तीकरण संमेलनच्या बैठका घेत आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता. या निकालामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. विरोधक बेकायदेशीर सरकार, असंवैधानिक सरकार, खोक्याचे सरकार, असे म्हणत होते. त्यावर कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळेच नवीन सरकार अिस्तत्वात आले हे सुप्रिम कोर्टानेच मान्य केले आहे. यावर पत्रकारांनी तत्कालीन राज्यपाल यांच्या राजकीय हस्तक्षेपाबद्दल ही कांही निरीक्षण नोंदविले आहे. या संदर्भात विचारले असता. बावनकुळे यांनी या संदर्भात बोलताना सरकार विषयी महत्वाचा निर्णय होता. विरोधकांनी सरकार बरखास्तीची मागणी केली होती. असे असताना ही सर्वोच्च न्यायालयाने सरकार विषयी कोणतीही टिप्पणी केली नाही, असे ही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे सुजितसिंह ठाकूर, अामदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते.

 
Top