परंडा/ प्रातिनिधी -

स्वराज्यातील छञपती शिवाजी महारांजाचे प्रामाणिक ,विश्वासु मावळे असणारे नरवीर शिवा काशीद यांची जंयती शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला येथे  छञपती शासन ग्रुप, प्रा. डाॕ.तानाजी सावंत प्रतिष्ठाण व नाभिक समाज बांधवाच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या ऊत्साहात शुक्रवार दि.५ रोजी साजरी करण्यात आली.

वीररत्न नरवीर शिवा काशीद यांच्या जंयतीनिमित्त शिवप्रेमी व नाभिक समाज बांधवाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी छञपती शासन ग्रुपचे संस्थापक प्राणजीत गवंडी, व्हाईस आॕफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, प्रमोद वेदपाठक,विशाल काशीद,संतोष भालेकर, जयदेव गोफणे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष जमील पठाण, लाला पठाण,बालाजी नेटके,बापुसाहेब देशमुख,आप्पा कारंडे,प्रभाकर शेंडगे, विकास गोफणे, करण काशीद, श्रीमंत शेळके, अक्षय उदागे,शुभम मोहिते,दिपक सुर्यवंशी आदिसह शिवप्रेमी युवक, नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी छञपती शासन ग्रुपचे गवंडी यांनी ऐतिहासिक दाखले देत, शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी पन्हाळगडावर आपल्या प्राणाची बाजी लावुन बलिदान देणारे ,गुप्तहेर खात्याचे प्रमुख नरवीर शिवा काशीद  यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.वीर शिवा काशीद हे छञपती शिवरायांचे एकनिष्ठ मावळे होते.त्यांनी केलेल्या प्राणदान,हुतात्म इतिहासात कायम सर्वांच्या स्मरणात राहणारे आहे. वीर शिवा काशीद यांचे पन्हाळगड पायथ्याशी नेबापुर येथे मोठे स्मारकही उभारण्यात आले आहे.यावेळी शिवप्रेमी, नाभिक समाज बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top