धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव येथील डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय येथील सहाय्यक प्राध्यापक इकबाल शब्बीर शाह यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ येथून पीएचडी मिळाली आहे. मानवी हक्कांच्या संदर्भात स्त्रियांच्या पुनरुत्पादक अधिकारांवर एक गंभीर अभ्यास "अ क्रिटिकल स्टडी ऑन रिप्रोडक्टिव राइट्स ऑफ वूमेन ; अ ह्यूमन राइट्स परस्पेक्टि" या विषयावर त्यांनी प्रोफेसर डॉ.एस आर कटारी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. शाह यांनी यापूर्वी अनेक विषयावर अभ्यासपुर्ण संशोधन व लिखाण केले असुन त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालय समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. शाह यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

 
Top