नळदुर्ग/ प्रतिनिधी-,

 शहरातील नाल्या तुडुंब भरल्याने पालिकेने स्वच्छता वेशीवर टांगली की काय असा प्रश्न पडत असून गेल्या महीन्याभरापासून शह मीरातील स्वच्छतेची एैसी की तैसी झाली आहे, त्या मुळे लाखो रुपये खर्चून ही शहर स्वच्छ होत नसताना दिसत आहे, दरम्यान शहरातील स्वच्छतेचे ती तेरा वाजले आहेत, केवळ शहरात जाणारा मुख्य रस्ता व मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या बाजून असलेल्या दर्शनी भागातील नाल्या साफ करुन शहर स्वच्छतेचा ठेंबा मिरवणाऱ्या अधिकाऱ्यांना शहरातील इतर भागातील घाण दिसत नाही का असा प्रश्न ही नागरीकांतून विचारण्यात येत आहे. सर्वत्र शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे साथीच्या आजाराची शक्यता वर्तविण्यात येत आसल्याने शहरातील सर्व नाल्या साफ करुन घ्याव्या अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

गेल्या एक दिड महीन्यापासून शहरातील नाल्यांची सफाई केली जात नाही. शहरात सर्वत्र नाल्या घाणीने तुडूंब भरल्या आहेत, त्यामुळे घाण पाणी साठल्याने आणि नाल्यावर गवत उगवल्याने नाली शोधावी लागत आहे. सर्वत्र घाण पाणी नाल्याच्या बाहेर येवून रस्त्यावरुन जात आहे. परिणामी यामुळे साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळया पूर्वी या नाल्या साफ होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी नाल्या साफ होत नसल्याने शहरात डासांची प्रादुर्भाव वाढला आहे. एक दीड महीन्यापासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील दर्शनी भागातील नाला साफ करुन घेतला जातो आणि शहरातील इतर भागातील नाल्या साफ केल्या जात नाहीत, केवळ कागदो पत्री नाल्या साफ करण्यात आला आसल्याचा कागदी अहवाल मात्र दिला जात असल्याची चर्चा आहे. शहरातील मराठा गल्ली, गवळी गल्ली, ब्राम्हण गल्ली, कुरेशी गल्ली, काझी गल्ली, मुलतान गल्ली, किल्ला गेट, यासह इतर भागातील नाल्या घाण पाण्याने तुडूंब भरल्या आहेत, या नाल्यातून घाण पाणी रस्त्यावरुन जात आहे, या कडे पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. कोणताही अधिकारी पालिकेचा या स्वच्छतेच्या बाबतीत पूढे येत नाही. त्यांना शहर स्वच्छतेच्या बाबतीत कांही एक देणे घेणे नाही. कारण पालिकेत जे कांही अधिकारी आहेत ते बाहेर गावाहून येतात त्यामुळे शहरातील स्वच्छता होत आहे किंवा नाही याच्याशी कांही एक देणे घेणे नाही. त्यामुळे याचा परिणाम शहरवाशीयांना भोगावा लागत आहे. कांही ठिकाणी तर नागरीकच आपल्या घरासमोरील नाला साफ करीत आहेत. मग पालिकेकडून एवढया मोठया प्रमाणात लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च केला जातो तो पैसा कुठे जातो असा प्रश्न निर्माण होत आहे. 

त्याच बरोबर शहरात पालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. ती शौचालये ही पालिकेकडून साफ केली जात नाहीत, त्यामुळे या शौचालयाच्या ठिकाणी ही घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत पालिकेने बांधलेली सार्वजनिक शौचालये साफ करणे बंधनकारक आहे मात्र या कडे कोणी ही लक्ष देत नाही. अनेक सार्वजनिक शौचालयाचा नागरीक वापर करीत आहेत परंतु त्या ठिकाणी शौचालये वेळीच साफ केली जात नसल्याने त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे गेल्याच महीन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचा गौरव करण्यात आला आहे, ही कौतुकाची बाब आहे मात्र त्यांच्याच नगरीमध्ये स्वच्छतेचे धिंडवडे निघत असतील तर हे दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी या बाबत तात्काळ शहर स्वच्छतेच्या बाबतीत पाउल उचलून शहरातील गल्ली बोळातील तुंबलेल्या नाल्या साफ करण्याची मोहीम हाती ध्यावी अशी मागणी होत आहे.


 
Top