धाराशिव (प्रतिनीधी) ः- पासून जून पर्यंत तुमचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री असताना शेतकर्यांना न्याय मिळाला नाही. 2020 च्या पिक विम्यासाठी शेतकर्यांना आजपर्यंत लढावे लागत आहे, ही तत्कालीन सत्ताधार्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच बैठक घेतली असती तर दोन वर्षांपूर्वीच शेतकर्यांना पैसे मिळाले असते. आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी केलेल्या अभूतपूर्व न्यायालयीन संघर्षामुळेच शेतकर्यांना भरपाई मिळू शकली आहे. तुम्ही काय केलं हे सांगा ? तुम्ही किती तारखांना उपस्थित होता, तुमचे वकील कोण ? खासदार असतानाही आजवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या प्रत्येक सुनावणीवेळी आरोप करणारे कोठे होते? यांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची दानत नाही. विरोधकांच्या प्रतिक्रियेतून त्यांची नैराश्यता व हतबलता स्पष्ट होते. तत्कालीन ठाकरे सरकारच्या मुक संमतीने शेतकर्यांच्या हक्काच्या नुकसान भरपाई वर गदा आणू पाहणार्या विमा कंपनीला ही मोठी चपराक आहे. त्यांच्या घशातून रुपये 310 कोटी काढले आहेत, व उर्वरित न्याय भरपाईसाठी देखील आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढा सुरूच राहणार आहे.