तेर (प्रतिनिधी) :- दाऊतपूर ता. धाराशिव येथे स्वयं शिक्षण प्रयोग मंजिरी सखी प्रोडूसर अंतर्गत लक्ष्मी दूध संकलन आणि शीतकरण केंद्राचे उद्घाटन स्वयं शिक्षण प्रयोग च्या तबसूम मोमीन, सरपंच बंकट शिंदे, आत्मा विभागाचे नागेश उगलमुगले, मंजिरी सखी प्रोडूसर कंपनीच्या संचालक दिपाली थोडसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित दूध उत्पादक शेतकर्यांना तबसूम मोमीन यांनी स्वयं शिक्षण प्रयोग अंतर्गत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रोमथेअन कंपनीचे मोहन पाटील यांनी लक्ष्मी केंद्राची उद्देश आणि वैशिष्ट्ये सांगितली. डॉ.रंगनाथ वराळे यांनी उपस्थित दूध उत्पादक शेतकर्यांना जनावरांचे दैनंदिन व्यवस्थापन चारा व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. आत्मा विभागाचे नागेश उगलमुगले यांनी आत्मअंतर्गत असणार्या योजना विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवासगिरी महाराज यांनी केले. तर आभार प्रदर्शन सरपंच बंकट शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास कंपनीचे रवी विपूरी, उपसरपंच कानिफनाथ भांगे ,पोलीस पाटील संतोष मदने, माजी सरपंच राजाभाऊ भांगे, दूध संकलन केंद्र चालक रेखा गडदे व गावातील महिला आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.