परंडा / प्रतिनिधी -

आज भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त प्रदेश सरचिटणीस मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे भारत मातेचे पुजन करून ध्वजारोहण केले.

     यावेळी जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, भाजपा नेते मुकुल देशमुख, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा चिटणीस ॲड. जहीर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस श्री. रामकृष्ण घोडके, मा. नगरसेवक मुसाभाई हन्नुरे, शहराध्यक्ष युवा मोर्चा ॲड. संदीप शेळके, शहराध्यक्ष महिला मोर्चा सौ. ज्योतीताई भातलवंडे, उमाकांत गोरे, अविनाश विधाते, सुरज काळे, मनोज पवार, सिध्दीक हन्नुरे, अजिम हन्नुरे, गौरव पाटील तसेच शहरातील इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकूर यांनी उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 
Top