धाराशिव / प्रतिनिधी-

मी सावरकर वीर सावरकर, स्वातंत्र्य वीर सावरकरांचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता की जय अशा जयघोषात धाराशिव शहरातील सावरकर समर्थक भाजपा कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्त्यानी जोरदार फेरी काढली.

 याप्रसंगी तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटिल, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांची प्रमुख उपस्थिति होती. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा अपमानजनक उल्लेख केल्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे या अनुशंगाने धाराशिव भारतीय जनता पार्टी ने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले होते याचे सूत्रसंचालन भाजपाचे उपाध्यक्ष व गौरव यात्रेचे संयोजक युवराज बप्पा नळे यांनी केले.

 या यात्रेचा शुभारंभ करताना आ. राणाजगजीतसिंह पाटिल यांनी महापुरुषांच्या बाबतीत कोणीही बोलताना मर्यादा संभाळण्याची गरज व्यक्त केली, तसेच राहुल गांधी यांना न्यायालयने मोदी आडनावाचा अपमानजनक उल्लेख केल्याबद्दल शिक्षा सुनावली आहे तिथे त्यांनी सावरकरांचा उल्लेख करण्याचा संबंध येतो कुठ ? असा प्रश्न केला. तसेच जिल्हाध्यक्ष नितीन काळे यानी सावराकरांच्या कामाचे मूल्यमापन कारन्याएवढी राहुल गांधी यांची लायकी नाही सावरकरांच्या अपमानाची परतफेड जनता करेल असे वक्तव्य केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनीही आपल्या भाषणात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.

 या गौरव यात्रेत माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सुनील तात्या काकडे, ॲड. नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, सतीश दांडणाईक, पांडुरंग लाटे सर, राहुल पाटील सास्तुरकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, अभय इंगळे, प्रविण पाठक, महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पणगुडे, अस्मीताताई कांबळे, उषा सर्जे, मनिषा केंद्रे, पांडूरंग अण्णा पवार, इंद्रजित देवकते, राजाभाऊ कारंडे, मोहन मुंडे, संग्राम बनसोडे, सुजित साळुंके, प्रविण सिरसाठे, समाधान मते, संदिप इंगळे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, रोहीत देशमुख, प्रीतम मुंडे, वैभव हंचाटे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, गीरीश पानसरे, बालाजी कोरे, विद्या माने, देवकन्या गाडे, श्रीराम मुंबरे, अतुल चव्हाण, मेसा जानराव, सागर दंडनाईक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top