धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्हयात ७ एप्रील ते ९ एप्रील पर्यंत पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ८ ही तालुक्यातील ७१ गावात एकुण २५७१.३० हेक्टर फळबाग व पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठविला आहे.

 शेतकऱ्यांनी अहोरात्र मेहनत करुन जगवलेल्या फळबागांचे आवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या फळबागा माती मोल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. गहू, ज्वारी, कांदा, टोमॅटो, मिरची, द्राक्षे, आंबा, टरबूज, कलिंगड, अशा फळबाग व  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 आ. राणा  पाटील यांच्याकडून  नुकसानीची पाहणी

 जिल्ह्यात आवकाळी पावसाने गहू ज्वारी सह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आज कळंब तालुक्यातील शिराढोण, धाराशिव तालुक्यातील करजखेडा, ताकवीकी, धारूर, बामणी, वाडी बामणी व  तुळजापूर तालुक्यातील मोर्डा- तडवळा गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटी ने झालेल्या नुकसानीची पाहणी करून बळीराजाला धीर दिला. तसेच महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

   यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष  नितिन काळे, जिल्हा संयोजक  नेताजी पाटील, धाराशिव तालुकाध्यक्ष  राजाभाऊ पाटील,  कळंब तालुकाध्यक्ष   अजित पिंगळे, धाराशिव तहसिलदार  गणेश माळी, नायब तहसीलदार  काकडे,  नायब तहसीलदार शिंदे, प्र. गटविकास अधिकारी नलावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी राऊत, तालुका कृषी अधिकारी उस्मानाबाद   जाधव, तालुका कृषी अधिकारी तुळजापूर श्री. बीडबाग यांच्यासह संबंधित गावातील तलाठी, तसेच  .सतीश दंडनाईक, रामहरी शिंदे,  पंडितराव टेकाळे, विक्रमसिंह देशमुख  .दत्तात्रय साळुंके, श्री.पद्माकर पाटील,  शांत लोमटे,  किरण पाटील,  आनंद कंदले,  सुधीर भोसले,  अहमद पठाण,  अरविंद पाटील यांच्यासह संबंधीत गावातील लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


 
Top