धाराशिव / प्रतिनिधी- 

 धाराशिव  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सोमवार, दि.17 एप्रिल रोजी  जिल्हा काँग्रेसच्या वतीने जवाब दो  आंदोलन  करण्यात आले. हे आंदोलन ॲड.धीरज पाटील  यांच्या नेतृतवाखाली करण्यात आले. दरम्यान आपल्या विविध प्रश्नांचे ज्ञापन जिल्हाधिकारी देण्यात आले. दरम्यान यावेळी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी   भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीर चे माजी राज्यपाल  सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व 300 कोटीच्या ऑफर चा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे.  तसेच पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्यास का सांगण्यात आले?, भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची  मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली?,पुलवामा घटनेत वापरण्यात आलेले 300 किलो RDX कुठून आले?, गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केले गेले का?, सत्यपाल मलिक यांना RSS चे महासचिव राम माधव यांनी 300 कोटींची ऑफर दिली, यावर कारवाई होणार की नाही?, आदी प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात आले.  या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 
Top