तेर/ प्रतिनिधी- 

धाराशिव तालुक्यातील तेर येथे मंजिरी सखी प्रोड्यूसर कंपनी लि. अंतर्गत  लक्ष्मी दूध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन  तेरचे उपसरपंच  श्रीमंत फंड आणि स्वयं शिक्षण प्रयोग चे प्रोग्राम डायरेक्टर उपमण्यू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

  कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीचे संचालक दिपाली थोडसरे यांनी केले. त्याचप्रमाणे लक्ष्मी डेअरी चे महत्व व फायदे याविषयी मोहन पाटील यांनी सांगितले. तसेच प्रमोथीन कंपनीचे अविनाश भगत यांनी लक्ष्मी दूध संकलन केंद्र तेर मध्ये सुरू करण्याचे कारण तसेच त्यापासून होणारे फायदे स्पष्ट केले. आभार  राणी शिराळ यांनी मानले.या  कार्यक्रमास स्वयं शिक्षण प्रयोग चे दिलीप धवन ,मोमीन तब्बसुम, सुजाता पाटील ,आकाश लष्करे, अंजना साबळे , परमोथिन कंपनीचे अविनाश भगत  ,मोहन पाटील, रवी विपुरी, कमल कुंभार, कोमल कटकटे ,रेखा शिंदे, रेखा गडदे , अभिमान रसाळ ,अविनाश आगाशे ,लखन रसाळ ,राम कोळी, बापू नाईकवाडी, संजय लोमटे व  दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


 
Top