धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन गुरुवार दि.२० एप्रिल २०२३ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय ‍ प्राथमिक शाळा इटकळ, ता.तुळजापूर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात इटकळ व परिसरातील सर्व वयोगटातील ६०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद पाटील, सरपंच राहुल पांडूरंग बागडे, उपसरपंच फिरोज मुजावर ग्रामपचंचायत सदस्य श्रीकष्ण दत्तात्रय मुळे, काशीनाथ लकडे, अमोल पाटील, साहेब क्षिरसागर, बाबु भकानदार, अजितकुमार पाटील, सोसायटी संचालक दिनकर पाटील, ज्ञानेश्वर बंडगर,नागनाथ लकडे रामेश्वर पाटील, लव्हा गायकवाड, इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.लक्ष्मण इंगळे, डॉ. अश्विनी जाधव , डॉ. चिन्मय चौरसीया, डॉ. अनुषका सावंत, डॉ सई भगत यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे श्री.विनोद ओव्हाळ (जनंसपर्क अधिकारी) अमीन सय्यद, पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे व  आशा कार्यकर्त्या लक्ष्मी वाघमारे यांनी परीश्रम घेतले.

 
Top