धाराशिव / प्रतिनिधी-

राज्य आरोग्य संसाधन यंत्रणाकेंद्रपुणेयांच्यामार्फतराज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्त कार्यरत आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्य कार्यक्रम राबवले जातात.

 या कार्यक्रमांचे निर्देशांक दरमहा जाहीर केले जातात. यात जानेवारी २०२३ च्या अहवालानुसार आरोग्य निर्देशांकातील कामगिरीत धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी राज्यात पहिला प्रथम क्रमांक पटकावला आहे.माता-बाल आरोग्य व कुटुंब   कल्याण, असंसर्गजन्य आजार, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, कायाकल्प, लक्ष्य, आरबीएसके, आरसीएच पोर्टल, लसीकरण, रुग्णसेवा, टेलिमेडिसिन, हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम, आरकेएस, बांधकाम विभाग, प्रशासन, वित्त, किशोरवयीन स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, एकात्मिक साथरोग सर्वेक्षण आदितील कामानुसार गुणांकन करण्यात आले. कार्यक्रमात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

 
Top