भूम / प्रतिनिधी-

 पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना ११४ कोटींचा निधी मंजूर, संजय गाढवे यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

 भूम - राज्याचे कर्तव्यदक्ष सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून शहरातील सिमेंट काँक्रिट रस्ते व नाली बांधकाम यासाठी ११४ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती मा.नगराध्यक्ष  संजय गाढवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गुरुवारी संजय गाढवे यांनी मंजूर झालेल्या निधीची सविस्तर माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना संजय गाढवे म्हणाले की, शहरातील सिमेंट रस्ते, नाली कामासाठी तब्बल ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मागील अनेक वर्षांपासून आजतागायत  एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होणे ही शहरासाठी पहिलीच वेळ आहे.हा निधी मंजूर होण्यामागे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे मोठे योगदान असून या कामांसाठी मी व माझ्या सर्व सहकारी यांनी मंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली होती.शहराच्या विकास कामांसाठी सावंत साहेबांनी निधीची कतरता भासू देणार नाही हा दिलेला शब्द पाळला व शहरासाठी भरघोस निधी मंजूर करून दिला.मागील अडीच वर्षांच्या काळात सावंत साहेब आमदार झाल्यापासून शहरातील कोणत्याही विकास कामास निधी कमी पडत नसून त्यांच्याकडे केलेल्या प्रत्येक मागणीला सावंत साहेब हे सकारात्मक दृष्टिकोनातून विलंब न लावता प्रश्न मार्गी लावत आहेत असे गाढवे यांनी सांगितले.पुढे बोलताना गाढवे म्हणाले की सध्या मंजूर करण्यात आलेल्या ११४ कोटी रुपयांच्या निधीमध्ये शहरातील इरिगेशन ऑफिस ते कसबा हनुमान मंदिर,अलीम सर यांचे घर  रस्ता,पारधी पिढी ते कसबा गार्डन पर्यंत रस्ता,साठे चौक ते नगर परिषद कार्यालय, भूम परंडा रस्ता ते आरसोली रोड पर्यंत रस्ता,जुने पोस्ट ऑफिस ते पिठाची गिरणी पर्यंत रस्ता,राहुल लॉज ते कृषी उत्पन्न बाजार समिती रस्ता, भूम परंडा रस्ता ते फिल्टर प्लांट पर्यंत रस्ता,फ्लोरा चौक ते मेहेंतीशावली दर्गा (बायपास रोड) पर्यंत,गोलाई चौक ते मटण मार्केट पर्यंत रस्ता, भूम ते साबळेवाडी पर्यंत रस्ता,पाणी पुरवठा जाकवेल पर्यंत रस्ता,ओंकार चौक ते आलमप्रभू देवस्थान पर्यंत रस्ता,ओंकार चौक ते थोरली वेस पर्यंत रस्ता,निगलार चौक ते बाणगंगा नदी (पायऱ्या)पर्यंत रस्ता,कसबा धाकटी वेस ते थोरली वेस ते धाकटी वेस डावी बाजू पर्यंत रस्ता,माने सर ते गौसिया मज्जिद पर्यंत रस्ता, शाळू गल्ली ते संतोष शेंडगे यांचे घर पर्यंत रस्ता,हॉटेल सोनाली ते बागवान गल्ली पर्यंत रस्ता,ठाकूर घर ते रणखांब किराणा दुकान पर्यंत रस्ता,कुंभार दुकान ते महाजन यांचे घर पर्यंत रस्ता,पत्की पार ते हिंगे यांचे घर,फ्लोरा चौक ते पोलीस स्टेशन कंपाऊंड पर्यंत रस्ता,डॉ.कल्याणराव मोटे घर ते डॉ. बाराते यांचे घर पर्यंत रस्ता,अकॅडमी ते पोस्ट ऑफिस चौक पर्यंत रस्ता,आलमप्रभू रोड ते गुंजाळ यांचे घर पर्यंत रस्ता,सागर टकले घर ते आलमप्रभू पर्यंत रस्ता, फलके घर ते गणेश मंदिर पर्यंत रस्ता, कुंथलगीरी रस्ता ते ज्योतिबा मंदिर पर्यंत रस्ता या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे व लहुजी साठे नगर ते बार्शी परंडा रस्त्यावरील नाली बांधकाम करणे या विकास कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये विशेष बाब म्हणजे भूम ते साबळेवाडी हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत होता व त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता मात्र आता जवळचा मार्ग चांगल्या दर्जाचा तयार होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.तसेच शहरातील हजारो भाविकांचे कुल दैवत असलेल्या ज्योतिबा मंदिर याठिकाणी दर्शनासाठी जाण्यासाठी भाविकांना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत होती मात्र आता हा मंदिरा पर्यंत पक्का रस्ता होत असल्याने भाविक भक्त तसेच या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.पुढे बोलताना गाढवे म्हणाले की,आजमितीला शहरातील जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहेत,मात्र काही उर्वरित कामे देखील काही महिन्यात पूर्ण होणार आहेत.पालकमंत्री तानाजी सावंत यांनी यापुढे देखील शहराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे अश्वासन दिले असून मी मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शहरातील उर्वरित विकास कामांना गती देऊन ती कामे पूर्ण करणार असल्याचे मा.नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी सांगितले व पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांचे विशेष आभार मानले.


 
Top