तुळजापूर/ प्रतिनिधी-

  तिर्थक्षेञ तुळजापूरात साडेतीन शक्ती पिठाचा देखावा  असणारा  चिञरथाचे आगमन शनिवार दि.४रोजी सकाळी छञपती शिवाज महाराज पुतळ्याजवळ   त्याचे    आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या  हस्ते या   चिञरथातील देविचे पुजन करुन महाआरती करण्यात आली . हा चिञरथ पाहण्यासाठी भाविकांन सह शहर वासिंयांनी मोठी गर्दी केली होती.

  यावेळी बोलताना पाटील म्हणाले कि या देशात  देखाव्यामुळे देशपातळीवर तिर्थक्षेञ तुळजापूरची मान उंचावली आहे. महाराष्ट्र शाषणाने सुंदर,देखावा तयार केला आहे या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस , सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मी आभार मानतो  दोन दिवस येथे राहणार असुन नागरिकांनी तो आवर्जून पाहावा, असे आवाहन यावेळी केले.  यावेळी मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे उपस्थित होते. 

 
Top