तुळजापूर / प्रतिनिधी-

  जुनी पेन्शन योजना लागू करावी यावर अन्य मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचार्यांनी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक /  ग्रामविकास अधिकारी सहभागी होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE - १३६ चे राज्य कायदे सल्लागार देविदास चव्हाण यांनी प्रतिनिधीस दिली.

नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करावी व इतर मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती  संघटना महाराष्ट्र डीएनई- १३२ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई- -१३६ तसेच सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षक ,शिक्षेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे  धाराशीव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी कुंटुबासहीत मोर्चात सहभागी होणार आहेत यामध्ये सकाळी ११ वाजता धाराशिव येथे स्पोर्ट मैदान येथुन जिल्हाअधिकार्यालपर्यंत निघणार आहे तेव्हा राज्यातील या बेमुदत संपामध्ये धाराशिव (उस्मानाबाद) जिल्यातील ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहभागी होणार असणेबाबत राज्य कायदे सल्लागार देविदास चव्हाण व जिल्हा अध्यक्ष महादेव जगताप व सरचिटणीस सुदर्शन घोगरे यांनी  कळविले आहेत. निवेदनावर महादेव जगताप, सुदर्शन घोगरे, देविदास चव्हाण गुरुशरण पारे, आगरकर मॅडम , देवानंद रेड्डी, विजयसिंह नलावडे , लक्ष्मण जकेकुरे व सर्व तालुका अध्यक्ष/ सचिव यांनी स्वाक्षरी केली.

 
Top