धाराशिव/ प्रतिनिधी - 

 शिवसेना ठाकरे गटाचे माजी अामदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यावर टिकेची झोड उठविल्यानंतर जिल्हा परिषदचे माजी सभापती व सावंत याचे कट्टर समर्थक दत्ता साळुंके यंानी या मतदार संघात माजी आमदाराने काय विकास कामे केली असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर पुन्हा माजी अामदार ज्ञानेश्वर पाटील व त्यांचे चिरंजीव रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दत्ता साळुंके यांच्यावर १०० कोटीची कामे घरात आल्यामुळे ते आमच्यावर टिका करतात, असा आरोप केला. त्यामुळे भ्ूम-परंडा मतदार संघात राजकीय धुळवड सुरूच असल्याचे मानले जात आहे. 

शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर पालकमंत्री तानाजी सावंत व उमरग्याचे अामदार ज्ञानराज चौगुले एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. तर आमदार कैलास पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील  हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले. पालकमंत्री सावंत यांच्या गटाने त्यानंतर राजकीय कुरघुड्या करण्यास सुरुवात केली. कधी खासदार ओमराजे व अामदार कैलास पाटील यांच्यावर टिका तर कधी भाजप अामदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता खासदार ओमराजे व अामदार कैलास पाटील यांना जवळ करून कुरघुड्याचे राजकारण चालु केले.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले माजी अामदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चार आपत्यावरून संचालक पद रद्द केले. यावरून अामदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आजारी आसीयू मध्ये असताना आपल्या विरोधात पालकमंत्री यांनी सूडाचे राजकारण केले आहे. पैसा व सत्तेची घमंड येत्या निवडणुकीत आपण उतरू असा इशारा दिला. त्यानंतर सावंत यांचे कट्टर समर्थक जि.प.चे माजी सभापती दत्ता साळुंके व धनंजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर टिका करत त्यांना आव्हान दिले. त्यानंतर परत माजी अामदार ज्ञानेश्वर पाटील व त्यांचे चिंरजीत रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सावंत यांच्यावर टिका करत माझ्या प्रमाणेच जिल्हयातील अन्य प्रस्थापित नेत्यांचा काटा सावंत काढतील असा इशारा देत दत्ता साळुंखेच्या घरात १०० कोटीची कामे दिली आहेत असा आरोप केला. 

 
Top