तेर/ प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील २२ खेळाडूंची कोल्हापूर येथे दिनांक ४ व ५ मार्च या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणारी जिल्ह्यातील पहिलीच जिल्हा परिषदेची शाळा आहे .

 जिल्हा एॅम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त दिनांक २२ फेब्रुवारी रोजी तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत तेर ता . धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील खेळाडूंनी ८ , १० , १२ वर्ष वयोगटातील मुला मुलीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ५० , ६० , ८० , २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेसह  ५० × ४ बॅटन रिले , ४०० × ४ बॅटन रिले , उंच उडी , लांब उडी , गोळा फेक आदि क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले विशेष म्हणजे कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी शाळेतील २२ खेळाडूंची निवड झाली आहे असून एवढ्या मोठ्या संख्येने खेळांमध्ये प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूची निवड होणारी जिल्ह्यातील पहिलीच जिल्हा परिषदेची शाळा आहे यावेळी या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.


 
Top