परंडा / प्रतिनिधी-

 सिना - कोळेगाव प्रकल्पातुन कॅनॉल मध्ये पहिले उन्हाळी आवर्तन पाणी सोडल्याने तालुक्यातील कंडारी, भोंजा हवेली, कुभेंजा, मुगांव , खानापूर ,जामगांव , शेतकऱ्यांना उन्हाळ्यात रब्बी हंगामातील पिकांना व मुक्या जनावरांना,पशु पक्षांना पाणी आभावी होणारी गैरसोय दुर झाली आहे.

     या कामी कार्यकारी अभियंता मस्तुद , मुख्य अभियंता  राजगुरू, ज्युनिअर इंजिनियर जोशी , गवळी तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून पाणी  सोडल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोडलेल्या पाण्याचे पुजन ही करण्यात आले.

   यावेळी शेतकरी अंकुश ईटकर, बागायतदार सागर भांदुर्गे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, सदस्य प्रकाश ईटकर, फिरोज शेख, बापू लष्कर, पै.तात्या भागडे, बापु ननवरे, श्रीमंत महानवर, विलास गाढवे, विकास साळुंखे, पिंटू कदम, शिध्देश्वर भोजने, लक्ष्मण रेवडकर, प्रदिप मोरे, गणेश मांजरे, महेश मांजरे, चंद्रशेखर हांगे, नितीन खाडे आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


 
Top